वेब न्यूज – चंद्रावरील पाण्याचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावर मानवी वस्ती उभी करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग, संशोधन सतत चालू असते. आता एका नव्या संशोधनात चंद्रावर अब्जावधी टन पाणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांतील मोहिमांमधून दिसून आले आहे की, चंद्रावर पाणी पृष्ठभागावर आणि खनिजांच्या स्वरूपात आहे. यावेळी जे पाणी शोधण्यात आले आहे, ते चंद्राच्या पृष्ठभागावर पसरलेल्या लहान काचेच्या मण्यांमध्ये साठलेले आहे. चीनच्या शास्त्र्ाज्ञांनी सोमवारी सांगितले की, 2020 मध्ये चीनच्या रोबोटिक Chang’e-5 मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणलेल्या चंद्राच्या मातीच्या तपासणीवरून असे दिसून आले आहे की, या काचेच्या मण्यांमध्ये पाण्याचे रेणू आहेत. चंद्रावर सतत लहानमोठे लघुग्रह आदळत असतात. त्यांच्या या वर्षावाला ‘हाय एनर्जी फ्लॅश हिटिंग’ म्हणतात, ज्यामुळे हे काचेचे मणी निर्माण होतात. भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी आणि चंद्रावरील अंतराळवीरांच्या दीर्घकालीन मुक्कामासाठी हे पाणी केवळ पिण्यासाठीच नाही, तर इंधन म्हणूनही महत्त्वाचे आहे. या काचेच्या मण्यांमध्ये साठलेले पाणी गरम करून आपण मिळवू शकतो असे शास्त्र्ाज्ञ सांगतात. चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर घेऊन जाणारे पॅप्सूल इनर मंगोलियाच्या उत्तर चिनी प्रदेशात उतरले होते. Chang’e-5 मिशनमध्ये सुमारे 1.7 किलो माती आणि 32 काचेचे मणी गोळा करण्यात आले होते. नेचर जिओसायन्समध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलेले हे पाणी मानवाच्या तेथील पुढील वावरासाठी तसेच दीर्घ वास्तव्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारे साधन बनेल असा विश्वासदेखील या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. अंतराळात जीवन शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर सोडवताना हे संशोधन फार महत्त्वाचे ठरणार आहे.