ठसा – जिद्द आणि अभ्यास

>> रचना लचके

कितीही लहान गावातून येऊन किंवा कोणतीही आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानादेखील आपण आयुष्यात काहीतरी मोठं करायचं अशी स्वप्नं मनात बाळगून एक तरुण  म्हाते खुर्द, जावळी-सातारासारख्या एका  छोटय़ा गावातून येतो आणि मुंबईमध्ये स्वतःचा औद्योगिक प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून व्यवसाय उभारतो.

ही कथा आहे सुशांत भिलारे नावाच्या तरुण उद्योजकाची. 12 वीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून गावातच झालेले. नंतर मुंबईला येऊन नामांकित महाविद्यालयातून त्याने उच्च शिक्षण प्राप्त केले. जरी आई-वडिलांचे काहीच शिक्षण झालेले नसले तरी मुलांना शिकवायचे आणि त्यांना मोठे करायचे असे सुशांतच्या आई- वडिलांचे स्वप्न होते. वडील माथाडी कामगार म्हणून काम करीत असत आणि काही काळानंतर गावाला जाऊन शेती करू लागले. तीन मुलं आणि बायको असा संसार त्यांनी कष्टाने उभारला.

लहानपणापासूनच सुशांत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा होता. लहानपणी मधाच्या पोळ्यांचे त्याला खूप आकर्षण होते. त्यातून ताजा नैसर्गिक मध काढायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आणि इतर लोकांना तो मध विकून त्यातून चांगला नफा कमवायचा हा त्याचा छंद असे. यातून त्याची उद्योजकतेविषयी असलेली धडपड आपल्याला दिसून येते. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्याने विविध ठिकाणी नोकऱया केल्या. नोकरीमध्ये त्याची चांगली प्रगती होत होती. त्याच्या हुशारीमुळे आणि कामाप्रति असलेल्या निष्ठेमुळे त्याच्या कंपनीने त्याला Ireland, UK असे परदेश दौरेदेखील करविले. 10 वर्षे सातत्याने सुशांतने नोकरी केली आणि त्याच्या करीअरचा आलेख नेहमी उंचावला आणि स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून महिना एक लाख देणाऱया चांगल्या नोकरीला त्याने रामराम केला.

व्यवसाय म्हटले तर त्या विषयाचा प्रचंड अभ्यास आणि कष्ट आलेच. व्यवसायाचे पहिले सहा महिने सुशांतला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विविध प्रॉपर्टीजचा सुशांतने अभ्यास केला आणि त्याला जाणवले की, औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या कामांमध्ये बरीच व्याप्ती आहे आणि तेथे अभ्यास करून काम केले तर अनेक लोकांना त्यातून फायदा होईल आणि आपल्यालादेखील चांगला नफा प्राप्त होईल.

म्हणून 2017 साली midcwala या संकेतस्थळाची त्याने निर्मिती केली.  All Industrial Property Solution under one roof असे ते काम करतात. MIDC विभागात जर तुमचे कोणत्याही प्रकारचे  काम असेल तरी ते तुम्ही लगेच सुशांतच्या ओळखीने करू शकता. midcwala ns MIDC / Industrial Properties,Warehouse, Factory, Pharma Co. Labs, Chemical company, cold storage, Warehousing या क्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, तळोजा, खोपोली आणि रायगड येथे खरेदी, विक्री, भाडेपट्टी आणि त्यासंदर्भात सगळे पत्रव्यवहाराचे काम ते करतात.

आज MIDCWALA कंपनीमार्फत MIDC सोबतच इतर स्थायी मालमत्तेमध्येदेखील व्यवसाय करतात आणि आतापर्यंत 100 कोटींहून अधिक मूल्यांक असलेल्या मालमत्तांचे व्यवहार त्यांनी केले आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक परवानग्या लागतात आणि हेच काम आपल्यासाठी ते अगदी सोपे करून देतात. हेच सुशांतच्या यशाचे गमक आहे. गावच्या ठिकाणी जिकडे कमी साधने होती तरीदेखील सुशांतचे नेहमी नवं काहीतरी शिकायचं आणि नम्रतेने आपले काम पूर्ण करायचं आणि सर्व कामांमध्ये चिकाटीमुळे या स्पर्धात्मक जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे हे सर्व त्याने करून दाखविले.

ग्रामीण भागातल्या नव्हे तर सर्व तरुणांसाठी तो एक प्रेरणास्थान आहे. जिद्द आणि चिकाटी हा त्याचा स्थायिभाव आहे. आज तो नवी मुंबईबरोबरच महाराष्ट्रात इतर विविध ठिकाणी त्याच्या कामाला सुरुवात करीत  आहे. अशा प्रकारे त्याच्या व्यवसायाचा आलेखदेखील असाच दिवसेंदिवस वाढत राहो.

sompuraमेहनतीचे फळ

मध्यमवर्गीय कुटुंबात ध्रुव सोमपुरा यांचा जन्म ठाणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले. कॉमर्स विषयातून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. लहानपणापासूनच फॅमिली बिझिनेस खूप मोठा करायचा हे त्यांचे स्वप्न होते. 1998 साली त्यांनी कौटुंबिक व्यवसायामध्ये प्रवेश केला आणि गेल्या वीस वर्षांत तो व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढवत नेला. व्यवसायाची सुरुवात घरगुती मिनी पंप्सने केली होती व हळूहळू इतर विविध उत्पादनांचा समावेश केला. जसे की फायर फायटिंग पम्पिंग सिस्टम, हायड्रोन्यूमॅटिक सिस्टम्स, वॉटर ट्रीटमेंट प्लँट्स, केमिकल प्रोसेस पंप्स आणि हाय प्रेशर वॉशर्स. त्यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढली. काही वर्षांनंतर त्यांचा छोटा भाऊ हिरेन सोमपुराच्या सहकार्याने आणि वडील हरीश सोमपुरा यांच्या मार्गदर्शनाने श्याम आणि कंपनीचा व्यवसाय वाढवला व आज औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना सेवा पुरवीत आहेत. महाराष्ट्रासह दक्षिण हिंदुस्थानातसुद्धा त्यांचे अनेक ग्राहक आहेत.

कंपनीची स्थापना हरीश सोमपुरा यांनी 1974 साली केली. चांगल्या क्वॉलिटीची उत्पादने व आफ्टर सेल सर्व्हिस दिल्यामुळेच श्याम आणि कंपनीचे नाव ग्राहकांमध्ये प्रचलित झाले. सप्लायर्सकडून मिळणारा अधिकचा फायदा ग्राहकांना देणे हा त्यांचा विशेष गुण आहे. त्यामुळे सर्व ग्राहक आणि सप्लायर्स श्याम आणि कंपनीला नेहमीच साथ देतात.

मोठमोठय़ा कॉम्प्लेक्ससाठी व टॉवरसाठी फायर फायटिंग सिस्टीम, पिण्याचे आणि फ्लशिंगसाठी हायड्रोन्यूमॅटिक सिस्टीम व मॅन्युअल वॉटर ट्रान्सफर पंप, वेस्ट वॉटर  रिसायकलिंगचे पंप, स्विमिंग पूल व फाऊंटनसाठी लागणारे पंप, पाण्याच्या मोटर्स, ऑटोमेशन कंट्रोल पॅनेल्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, बोअरवेल पंप, गार्डन आणि क्लबसाठी लागणारे पंप आणि इलेक्ट्रिक जनरेटर अशा अतिशय आवश्यक व  महत्त्वाच्या वस्तूंची विक्री हे श्याम आणि कंपनीचे प्रमुख काम आहे.

श्याम आणि कंपनीकडे मुंबई, ठाण्यामधील सर्वाधिक मोठे शोरूम असून अनेक प्रस्थापित कंपन्यांची उत्पादने विक्रीला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परवडणाऱया किमतीमध्ये क्वॉलिटी ब्रँड्सच्या वस्तू विकणे ही श्याम आणि कंपनीची खासीयत आहे.  विशेष म्हणजे विक्रीनंतर देण्यात येणारी सेवा यात श्याम आणि कंपनीचा हातखंडा आहे. किर्लोस्कर, विलो, CRI  अशा नावाजलेल्या कंपन्यांचे इंडस्ट्रियल पंप्स, डोमेस्टिक पंप्स, स्पेशियल पंप्स, इंजिन्स, इलेक्ट्रिकल मोटर्स तसेच इलेक्ट्रिकल जनरेटर्स कंपनीकडे उपलब्ध आहेत. क्रॉम्प्टन ग्रीव्हज्चे इलेक्ट्रिक मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रो स्टार्टर आणि कंट्रोल पॅनलचे ते अधिकृत विक्रेते आहेत.

सप्लायर, डीलर, डिस्ट्रिब्युटर व सेलर अशा अनेक भूमिका ही कंपनी गेली कित्येक वर्षे पेलत आहे. सर्व प्रकारचे पंप, पोर्टेबल इलेक्ट्रिक जनरेटर, मोटर्स व त्याच्या सर्व एसेसरीज संपूर्ण देशभर विकण्याचे काम कंपनी करते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या