
मधमाश्यांचे पोळे, तेही अगदी फुलासारखे किंवा क्रिस्टलसारखे दिसणारे थ्रीडी आकाराचे… काय विश्वास बसत नाही ना….पण हे खरं आहे. ब्रिटनच्या संशोधकांनी मधाचं थ्रीडी पोळं तयार करणार्या मधमाश्यांच्या प्रजातीचा शोध लावलाय. टेट्रागोन्युला असे या मधमाश्यांच्या प्रजातीचे नाव आहे. या मधमाश्या आपलं गणिती डोकं वापरून पोळ्याचा खास पॅटर्न तयार करतात. तो गोल आणि उठावदार असतो. त्यामुळे मधाचं पोळं अगदी थ्रीडी प्रतिमेसारखं दिसतं.
ब्रिटनचे केंब्रिज विद्यापीठ आणि स्पेनचे ग्रेनाडा विद्यापीठ यांच्या संशोधकांनी अनोखी कारागिरी करणार्या मधमाश्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. संशोधकांच्या मते, दंश न करणार्या मधमाश्या थ्रीडी पोळं तयार करतात. त्यात कधी गोल, कधी बुल्स आय, तर कधी डबल स्पायरल असे फेरे घातलेले असतात. त्यामुळे पोळं पायर्या असलेल्या शेताच्या आकारासारखंही दिसतं. मधाच्या पोळ्याच्या किनार्यावर बाल्कनीचा आकारही दिसतो. तिथल्या प्रत्येक गोलात मधमाश्या एक अंड ठेवतात. त्यानंतर तो गोल बंद केला जातो. त्यामुळे करून बाल्कनीसारखी दिसणारी रचना तयार होते.
संशोधकांच्या मते, टेट्रागोन्युला मधमाश्यांचे पोळे दिसायला ’मल्टी स्टोअर कार पार्किंग’सारखे दिसते. ते तयार करायला मधमाश्या खास गणिती फॉर्म्युलाचे पालन करतात.

























































