प्रदूषणामुळे कृत्रिम फुप्फुसांचा बदलला रंग 

692

नववर्षाच्या सुरुवातीला वांद्रे पश्चिम येथे  विशाल ‘हेपा – फिल्टर लंग्ज’ बसवले आहेत. खर्‍या फुप्फुसांसारखे काम करणारी ही फुप्फुसे अवघ्या  दोन आठवड्यांत पांढर्‍या रंगापासून काळ्या रंगाची झाली. आरोग्य तज्ञांनी ही बाब अतिशय गंभीर असल्याचा दावा केला आहे. वायू प्रदूषणावर काम करणार्‍या संस्थांनी मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी राज्य सरकारकडे योग्य पावले उचलण्यासाठी आवाहन केले आहे.

मुंबईत ही फुप्फुसे आर.डी. नॅशनल कॉलेज जंक्शनच्या बाहेर बसवली आहेत. या उपक्रमात हवा प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा घातक परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  ही कृत्रिम फुप्फुसे 14 जानेवारी  रोजी झटका डॉट ऑर्ग आणि वातावरण फाउंडेशनच्या सहकार्याने बसवली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दुसर्‍या दिवसापासूनच या फुफ्फुसांचा रंग झपाट्याने बदलू लागला.

जेव्हा एखादी व्यक्ती प्रदूषित हवेचे श्वसन करते तेव्हा शरीरात काय बदल घडतात, हे दर्शवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे लीलावती रुग्णालयाचे मुख्य पल्मोनोलॉजिस्ट डॉ. संजीव मेहता म्हणाले. आम्हाला मुंबईची ‘क्लीन एअर’ योजना अधिक प्रभावी करायची आहे, असे वातावरण संस्थेचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या