ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

476

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रायोगिक रंगभूमीची अव्याहतपणे सेवा करणारे, प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळवून देण्यासाठी झटणारे, ‘आविष्कार’ नाटय़संस्थेचे अध्वर्यू अरुण काकडे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. नाटय़वर्तुळात काकडे काका म्हणून परिचित असणाऱ्या या ज्येष्ठ रंगकर्मींच्या निधनाने समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात सून, दोन नातू असा परिवार आहे. अरुण काकडे यांची प्रकृती वयोपरत्वे खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज वाकोला येथील घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या