
लडाख आणि लेहमध्ये हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव असतानाच आता अरुणाचल प्रदेशातही तणाव वाढल्याचे दिसत आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) हिंदुस्थानी आणि चीनी सैनिक आमने-सामने आले होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील सैन्यामध्ये तणाव वाढला होता. हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 200 सैनिकांनी हिंदुस्थानी जवानांनी रोखले आहे.
चीनी सैनिक हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याने तणाव वाढला होता. त्यानंतर कमांडर स्तरावर चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. हिंदुस्थान-चीनमधील लेह लडाखमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तणावाचे वाचावरण आहे. चीनच्या अनेक कुरापतींना हिंदुस्थानी लष्कराचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत.
लेह लडाखमधील हा तणाव आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पोहचला आहे. हिंदुस्थानी आणि चीनचे सैनिक सीमाभागात गस्त घालताना आमने सामने आले होते. त्यावेळी हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 200 चिनी सैनिकांना हिंदुस्थानी जवानांनी रोखले. त्यावेळी त्यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. तणाव वाढत असल्याने कमांडर स्तरावर चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता सीमाभागात तणावपूर्ण शांतता आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.




























































