
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप या विषयावर केवळ राजकारण करत असून पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा कायदा घाईघाईने संमत करण्यात आला, अशी टीका त्यांनी केली आहे.
एएनआयशी (ANI) संवाद साधताना अरविंद सावंत म्हणाले की, “जेव्हा तुम्ही महिला आरक्षणाबद्दल बोलता, तेव्हा महिलांना आरक्षण देण्याचा कायदा तर मंजूर झाला आहे, मात्र त्यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. २०२६ ची जनगणना होईल आणि त्याचे काम संपल्यानंतर २०२८ पर्यंत जनगणनेची आकडेवारी समोर येईल. जर २०२९ मध्ये याची अंमलबजावणी करायची असेल, तर ती होऊ शकणार नाही.”
सावंत यांनी भाजपच्या हेतूवर शंका उपस्थित करत पुढे म्हटले की, “पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, म्हणून हा कायदा मंजूर करावा असे त्यांना वाटले. ते केवळ निवडणुकीचा विचार करून लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. असे कायदे प्रत्यक्षात कसे लागू होतील? माझी महिलांना विनंती आहे की, त्यांनी यातील सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा.”
#WATCH | मुंबई, महाराष्ट्र: शिवसेना(UBT) सांसद अरविंद सावंत ने महिला आरक्षण पर कहा, “जब आप महिलाओं के आरक्षण की बात करते हैं तो महिलाओं को आरक्षण देने का कानून तो पास हो चुका है। जनगणना होने की आवश्यकता है। 2026 की जनगणना होगी, उसका काम समाप्त होने के बाद 2028 तक जनगणना आ जाएगी।… pic.twitter.com/Bzd8lxIN1f
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2026


























































