
क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी तुरुंगात असलेल्या आर्यन खान याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्याची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र त्याची बेल ऑर्डर वेळेत आर्थर रोड तुरुंगात न पोहोचल्याने त्याची आज सुटका होणार नसल्याचे आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021
आर्यन खान याला काल जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी साड़े पाच वाजेपर्यंत त्याची बेल ऑर्डर तुरंगात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्याची बेल ऑर्डर साडे पाच पर्यंत न पोहोचल्याने त्याची सुटका आता शनिवारी होणार आहे. आर्यन खान साठी प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला ही जामीन राहिली आहे.
Aryan Khan’s bail | A physical copy of the release order has to be put into the bail box outside Arthur Road Jail for the release. The jail officials wait until 5.35 pm for this: Nitin Waychal, Arthur Road Jail Superintendent pic.twitter.com/bV3fz9N7LD
— ANI (@ANI) October 29, 2021
आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर जो बॉक्स आहे त्यात बेल ऑर्डर वकिलाने टाकायच्या असतात. आम्ही आर्यन खानच्या बेल ऑर्डरची 5.35 पर्यंत वाट पाहिली. मात्र तो पर्यंत बेल ऑर्डर आले नव्हते, असे आर्थर रोड तुरुंगाचे अधिक्षक नितीन वायचल यांनी सांगितले.





























































