हैदराबादेत भाजप नेत्यांची फौज; आता फक्त ट्रम्प यायचे बाकी, ओवेसींची टोला

हैदराबाद निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाही प्रचारासाठी उतरणार आहेत. आता या निवडणुकीत फक्त ट्रम्प यायचे बाकी आहेत असा टोला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी लावल आहे.

हैदराबाद निवडणुकीच्या प्रचारात ओवेसी म्हणाले की, “इथे भाजप नेत्यांची फौज पोहोचली आहे. मला जीना म्हणात, काय काय प्रचार सुरू आहे. जणू काही हैदराबादची जनतेला एक नवीन पंतप्रधान मिळणार आहे. आतापर्यंत मोठे दिग्गज या निवडणूकीत आले आहेत. आता फक्त डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या प्रचारसाठी यायचे बाकी आहेत असे ओवेसी म्हणाले. तसेच जरी ट्रम्प आले तरी या काही फरक पडणार नाही, ही निवडणूक आपणच जिंकू असे ओवेसी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या