मला जीना ठरवून लोकांना घाबरवलं गेले, ओवेसींची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी नेहमीच मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांना हात घातला, पण मी जीना आहे आसे सांगून लोकांना घाबरवले अशी अप्रत्यक्ष टीका खासदार ओवेसी यांनी भाजपवर केली आहे.

द हिंदू या वृत्तपत्रात शेख मुजबीर रेहमान यांनी एक लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी ओवेसी हे मुस्लिम नेते म्हणून पुढे आले आहेत पण ओवेसी यांच्यात मोहम्मद अली जीना यांचे गुण नसल्याचे म्हटले आहे. हा लेख ओवेसी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी नेहमीच मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांना हात घातला आहे. मुस्लिम समाजाला कशा प्रकारे गृहीत धरले जाते हा मुद्दा मी मांडला आहे, पण मला जीना ठरवून लोकांना घाबरवले गेले असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी ओवेसी यांना जीना म्हटले होते, त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.