
बलात्काराच्या गुह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची सुरतच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूजा आणि आरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमधील काही डॉक्टर, नर्स व सुरक्षा रक्षकही यात सहभागी झाले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी दोघांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.