पाच मुलं असणारा क्रिकेटपटू दुसऱ्या लग्नाच्या तयारीत, वर्ल्डकपमध्ये केलं होतं देशाचं नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटपटू मैदानासह आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अनेक क्रिकेटपटूंनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले. परंतु सध्या एक क्रिकेटपटू पहिली पत्नी आणि पाच मुलं असतानाही दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. या खेळाडूने साखरपुडाही उरकून घेतला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगान याने साखरपुडा केला आहे. लवकरच तो दुसरे लग्न करणार आहे. विशेष म्हणजे असगरला पहिली पत्नीही असून तिच्यापासून त्याला पाच मुलंही आहेत.

असगर अफगान याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पत्नीसोबत साखरपुडा केला. याची माहिती अफगाणिस्तानच्या एका पत्रकाराने दिली. अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान दुसरे लग्न करत असून त्याचा साखरपुडा झाला आहे. असगरला पहिल्या पत्नीपासून पाच अपत्य असून त्यात चार मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे, असे ट्वीट पत्रकाराने केले.

वर्ल्डकपमध्ये केले नेतृत्व

असगर अफगान याने 2019 मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले होते. 2009 मध्य़े आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या असगर अफगान याने 114 एक दिवसीय लढतीत 2424 धावा केल्या आहेत. तसेच 72 टी-20 लढतीत त्याच्या नावावर 1341 धावांची नोंद असून 6 कसोटीत 440 धावा आहेत.