
स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ नेते डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भाईंचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी समर्पित होते. गरजू, वंचित, शोषितांसाठी त्यांनी विधिमंडळापासून रस्त्यापर्यंत आक्रमक संघर्ष केला. ते एक अभ्यासू व निर्भीड लोकप्रतिनिधी होते. भाई केशवराव धोंडगे व डॉ. शंकरराव चव्हाण यांचा वैचारिक संघर्ष होता. पण वैयक्तिक पातळीवर त्यांचे संबंध अतिशय चांगले होते, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.





























































