नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली – अशोक चव्हाण

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फॉलो करणं आवश्यक होतं. तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके पुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि पुणी एकत्र भरत असेल तर 2 टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या