सुखकर्ता दुःखहर्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझा आवडता बाप्पा- अशोक पत्की

  • आपलं आवडतं दैवत? – गणपती. कारण आपण नवीन कार्याची सुरुवात गणपतीपासूनच करतो.
  • त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – चौसष्ट कलांचा अधिपती असल्यामुळे सामान्य माणसापासून कलावंत, गायक, वादक सर्वांनाच त्याच्याकडून प्रेरणा मिळते.
  • संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो, असं वाटतं?- फक्त संकट नाही, त्याला सुखकर्ता-दुःखहर्ता असं म्हटलंय. त्याच्यामुळे आनंदात आणि संकटातही त्याची आठवण येते.
  • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – दररोज पूजा करतो. वयाच्या 24व्या वर्षापासून ही पूजा सुरू आहे. नाही केली तर दिवसभर काहीतरी राहिलंय असं वाटत राहतं.
  • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? – माझी बहीण गणपतीची गाणी गायची. ही गाणी ऐकण्याची वाट आम्ही बघत राहायचो. तेव्हा वसंत प्रभू, वसंत पवार, राम कदम, विश्वनाथ मोरे यांची गाणी, दीदींनी गायलेली आरती ऐकली की, प्रसन्न वाटतं.
  • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? – बऱ्याचदा असं झालंय की, सिनेमा, अल्बमची गाणी लोकांना आवडतात. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला फारच थोडे दिवस शिल्लक असताना एक गाणं केलं.
  • आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते? – अगदी साधं पितांबर नेसलेला, अंगावर शेला घेतलेला असं स्वरुप आवडतं. जेवढा साधा तेवढा मला तो जास्त आवडतो.
  • त्याच्यापाशी काय मागता? – कृपादृष्टी राहू दे.
  • त्याची नियमित उपासना कशी करता? – देवपूजा करतो आणि पोथी वाचतो. कायम मुखात प्रणम्य शिरसा… असतं. रेकॉर्डिंगला सुरुवात करण्यापूर्वी, नवीन गाण्याला संगीत देण्यापूर्वी, कोणतंही काम करताना आपोआप आठवतं. त्यामुळे सूर, शब्द, चाल पवित्रता निर्माण करते. प्रसन्नता वाटते.