
आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मायलेकावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने रविवारी सकाळी एका वृद्धेवर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
आष्टी तालुक्यात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. दोघा जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या बिबट्याने शनिवारी मायलेकावर हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी आष्टीपासून काही अंतरावर असणाऱ्या पारगाव बोराडे येथील एका वस्तीवरील शालनबाई शहाजी भोसले या शेतात भाजी आणण्यासाठी गेल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये शालनबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर आष्टीतील शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बिबट्याला जेरबंद करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान संपूर्ण आष्टी तालुका बिबट्याच्या हल्ल्यामुळे दहशतीखाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या