टीम इंडियासाठी खुशखबर, दिग्गज फिरकीवीर अश्विन कसोटीसाठी फिट 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम

इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटी क्रिकेट लढतीला काही दिवस उरलेले असतानाच टीम इंडियासाठी एक खुशखबर आली आहे. इसेक्सविरुद्धच्या सर्व लढतीत जखमी झालेला हिंदुस्थानचा दिग्गज ऑफस्पिनर कसोटीसाठी पूर्ण फिट झाला आहे. अश्विनने स्वतःच आपली दुखापत पूर्ण बारी झाल्याचे सांगत आपण कसोटी लढतीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Just comfortably numb at the crease #essex #uk #indvseng

A post shared by Ravichandran Ashwin (@rashwin99) on

इंस्टाग्रामवर आपल्या फिटनेसबाबत माहिती देताना रविचंद्रन अश्विनने गोलंदाजी करतानाचा आपले छायाचित्रही शेयर केले आहे. अश्विनचे फिट होणे टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तो संघाचा प्रमुख फिरकीवीर आहे. शिवाय तामिळनाडू प्रीमियर लीग खेळण्यापूर्वी अश्विनने इंग्लंच्या कौंटी क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केलेले आहे. त्याची संघातील उपस्थिती फिरकीविरुद्ध धडपडणार्‍या इंग्लिश फलंदाजांसाठी अडचणीची ठरू शकते.