
टीम इंडियाचा माजी फिरकीवीर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेतील टी-20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी त्याने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स क्लबशी करार केला आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला माजी हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.
अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला, मात्र हा हंगाम त्याच्यासाठी विशेष ठरला नाही. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर त्याने या लीगलाही अलविदा केला. आता निवृत्तीनंतर तो जागतिक लीगकडे वळला आहे. ‘एमएलसी’चा 2026 हंगाम 18 जूनपासून सुरू होणार असून हे सामने टेक्सास, लॉस एंजेलिस आणि ऑकलंड येथे खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 18 जुलैला ऑकलंड कोलिझियममध्ये होणार आहे.































































