Asia Cup 2025 – हिंदुस्थान-पाकिस्तान एकाच ग्रूपमध्ये येणार आमने-सामने? UAE मध्ये खेळण्यास BCCI सहमत

Asia Cup 2025 सप्टेंबर महिन्यात खेळला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने दुबई आणि अबू धाबीमध्ये खेळण्यास BCCI ने सुद्धा सहमती दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) वार्षिक सर्वसाधारण सभा बांगालदेशाथील ढाका येथे पार पाडली. बांगलादेशातील राजकीय तणावामुळे BCCI ने बैठकीला न जाण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. परंतु व्हर्च्युअल पद्धतीने BCCI च्या वतीने राजीव शुक्ला या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये आशियाई चषकाच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये 24 जुलै रोजी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक घेण्यात आली होती. बीसीसीआयच्या वतीने राजीव शुक्ला यांनी व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार स्पर्धेची सरुवात 7 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. तसेच स्पर्धेचा शेवट हा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकतो. पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर बीसीसीआयने ECB सोबत 3 मैदानांसाठी करार केला आहे. परंतु आशियाई चषकाचे सामने फक्त दोन स्टेडियमवर खेळले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि जायद क्रिकेट स्टेडियम (अबू धाबी) ही दोन संभाव्य स्टेडियम आहेत.

टीम इंडियाचा ‘पाय’ खोलात! ऋषभ पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर, 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला

आशियाई चषकामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. तसेच स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. यामध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान, ओमान, हॉंग कॉंग आणि UAE या देशांचा समावेश आहे. स्पर्धेत चार-चार संघांचे दोन ग्रूप केले जाणार आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान एकाच ग्रूपमध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक ग्रूपमधील अव्वल 2 संग सुपर-4 साठी पात्र ठरतील.