आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी त्यांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गोगोई यांची प्रकृती अतिशय खालवली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

गोगोई यांच्या मुत्यूची बातमी समजताच आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित दिब्रुगढ दौरा रद्द करून गुवाहाटी येथे निघाले आहेत. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री सोनोवाल ट्विट करून म्हणाल की, ‘सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मी दिब्रुगढ येथून गुवाहाटीला जात आहे, जेणेकरून तरूण गोगोई व त्यांच्या कुटुंबासोबत मला राहता येईल, कारण माजी मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आहे.’ दरम्यान, तरुण गोगोई 2001 ते 2016 पर्यंत असम आसामचे मुख्यमंत्री होते.

आपली प्रतिक्रिया द्या