विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; पुढील अधिवेशन 24 फेब्रुवारीला मुंबईत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhanbhavan

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत एकूण सहा बैठका झाल्या. प्रत्यक्षात 34 तास 39 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी 5 तास 50 मिनिटे कामकाज झाले. विधान परिषदेत नियम 93 अन्वये 27 सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 15 निवेदने स्वीकृत झाली. सभागृहात सात सूचनांवर निवेदने झाली तर तीन निवेदने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विधान परिषदेत 59 औचित्याचे मुद्दे प्राप्त झाले असून 45 मुद्दे मांडण्यात आले तसेच 509 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 139 सूचना मान्य झाल्या तर 30 सूचनांवर चर्चा झाली. विशेष उल्लेखांतर्गत 113 सूचना प्राप्त झाल्या तर 78 सूचना मांडण्यात आल्या. अशासकीय विधेयकावर 2 सूचना प्राप्त झाल्या व त्या दोन्ही स्वीकृत करण्यात आल्या. नियम 289 अन्वये 13 प्रस्ताव प्राप्त झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.