सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 21 मार्च रोजी सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार असल्याची माहिती नासाने दिली आहे. उल्कापिंडाचे नाव एफओ- 32 आहे. त्याचा शोध 20 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता.

नासाने केलेल्या दाव्यानुसार एफओ 32 आता खूप वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. उल्कापिंडाची लांबी तीन हजार फूट आहे. हा उल्कापिंड पाहण्यासाठी शास्त्रज्ञ खूप उत्सुक आहेत.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार उल्कापिंड पडल्याने पृथ्वीचे कोणतेही नुकसान होणार नाही. नासा संशोधन केंद्राचे प्रमुख पॉल चौडास यांनी सांगितले की, उल्कापिंड पृथ्वीपासून 1.25 दशलक्ष मैल अंतरावर असेल. याचा वेग ताशी 77 हजार मैली असा असेल. तरीही यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. उल्कापिंड आकाशात दक्षिण दिशेला दिसून येणार आहे. लकाकणारे उल्कापिंड कोणीही पाहू शकेल.