
लखनौ विद्यापीठाचे ज्योतिष सल्लागार केंद्र सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. आता या केंद्रात सगळ्यांनाच लग्न, करियर, आरोग्य, धन आणि वास्तूसंबंधित सल्ला सशुल्क मिळेल. ज्योतिष सल्लागार केंद्राची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून झालेली आहे. मात्र आतापर्यंत ज्योतिष सल्लागार केंद्र फक्त विद्यार्थी आणि कर्मचाऱयांसाठी मर्यादित होते. ज्योतिष प्रथा आणि या अंतर्गत दिल्या जाणाऱया सल्ल्याचे योग्य दस्तावजीकरण व्हावे, हा यामागील हेतू असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. मंजूर योजनेनुसार, जन्मपुंडलीवर आधारित बहुतेक सल्लामसलत किमान 15 मिनिटे चालेल आणि प्रत्येक सत्रासाठी रुपये 1,500 शुल्क आकारण्यात येणार आहे.
























































