दीर्घ मोहीम फत्ते करून परतले अंतराळवीर

तब्बल 167 दिवसांची अंतराळ मोहीम पूर्ण करून चार अंतराळवीर रविवारी पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पनामा शहराजवळील मॅक्सिको खाडीत यानाने लँडिंग केले आणि अंतराळ जगतात आणखी एक इतिहास रचला. मागील 53 वर्षांत पहिल्यांदाच एखादे यान अंधारात पृथ्वीवर उतरले आहे. याआधी 1968 साली नासाच्या अपोलो-8 यानाने अंधारात लँडिंग केले होते. त्या वेळी तीन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत परिक्रमा करून परतले होते.

नोव्हेंबर 2020मध्ये रेलिजियन्स यानातून अमेरिकेच्या तीन आणि जपानच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले होते. यात नासाचे माईक हॉपकिन्स, व्हिक्टर ग्लोबर, शॅनन वॉकर आणि जपानच्या सोईची नागुची यांचा समावेश आहे. चौघांनी 167 दिवसांची आतापर्यंत सर्वात दीर्घ मोहीम पूर्ण करून ते पृथ्वीवर परत आले आहेत. लँडिंग झाल्यानंतर अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पॅप्सूलला एका रिकव्हरी जहाजावर पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एकेक अंतराळवीर बाहेर आला. अमेरिकेचे अंतराळ यान पाण्यात लँडिंग करते, तर रशियाचे यान जमिनीवर लँडिंग करते.

आपली प्रतिक्रिया द्या