आजपासून ATM, रेल्वेसह ‘या’ 7 गोष्टींचे नियम बदलले, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून याच दरम्यान आजपासून (1 मे) अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. याचा थेट प्रभाव तुमच्या- आमच्या जीवनावर आणि खिशावर होणार आहे. काही नियमाद्वारे फायदा होणार आहे, तर काहीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या खिशावर ताण वाढणार आहे. पाहूया कोणते आहेत हे नियम…

पेन्शन

pension
EPFO ग्राहकांसाठी खुशखबर आहे. सरकारने नुकतीच निवृत्तीच्या 15 वर्षानंतर पेन्शन रक्कम देण्याचा नियम सुरू केला आहे. त्यामुळे अशा कर्मचारी वर्गास मे पासून संपूर्ण पेन्शन मिळणार आहे. याचा देशातील साडे सहा लाख पेन्शनधारकांना होईल.

ATM

atm-center
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे आणि साफसफाईवर भर दिला जात आहे. याला आता ATM देखील अपवाद नाही. कारण आता प्रत्येक व्यक्तीच्या वापरानंतर ATM स्वच्छ केले जाईल. अशी व्यवस्था गाझियाबाद आणि चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली आहे.

बोर्डिंग स्टेशन –

ticket-counter
रेल्वे सेवेसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला असून नव्या नियमानुसार आता प्रवासी चार्टच्या आधी 4 तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील. आधी ही मर्यादा 24 तास होती. परंतु प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यानंतरही प्रवास न केल्यास रिफंड मिळणार नाही.

गॅस सिलेंडर

प्रातिनिधीक फोटो

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. कारण 14.2 किलो वजनाचा आणि 19 किलो वजनाच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. 14.2 किलो वजनाचा सिलेंडर 162 तर 19 किलो वजनाचा गॅस सिलेंडर 256 रुपयांनी कमी झाला आहे. राज्य आणि शहरानुसार या किमती कमी झाल्या आहेत.

बचत खाते

sbi
एसीबीआय (SBI)ने 1 मे 2020 पासून बचत खात्यांवरील व्याज दर कमी केले आहे. एक लाखांपर्यंत जमा रकमेवर 3.50 टक्के आणि एक लाखापेक्षा अधिक रकमेवर 2.75 टक्के व्याज मिळणार आहे. आधी ते 3.25 टक्के होते.

विमानसेवा

airoplane
सरकारी विमान कंपनी एयर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. आता एयर इंडिया ग्राहकांनी तिकीट रद्द केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. तिकीट बुकिंगच्या 24 तासाच्या आत रद्द केल्यास शुल्क आकारले जाणार नाही.

PNB डिजिटल वॉलेट –

pnb
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आजपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. पीएनबीचे ग्राहक जे पीएनबी किटी वॉलेटचा वापर करत होते, ते आता डिजिटल मोड जसे की आयएमपीएसचा वापर करू शकतात. ग्राहकांच्या खात्यात शून्य रक्कम असल्यासच ते वॉलेट अकाउंट बंद करू शकतात. अन्यथा ग्राहकांना पैसे खर्च करावे लागतील किंवा आयएमपीएसद्वारे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या