एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा; सलामीलाच नदाल गारद

290

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल हा लंडनमध्ये सुरू झालेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत सलामीलाच गारद झाला. गतविजेत्या जर्मनीच्या ऍलेक्झांडर ज्वेरेव याने त्याला 6-2, 6-4 असे सरळ सेटमध्ये हरवून सनसनाटी निकाल नोंदवला.

33 वर्षीय राफेल नदालचा ज्वेरेवविरुद्धचा हा सहावा सामना होय. यात पहिल्यांदाच त्याला जर्मनीच्या या प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. फिटनेसच्या समस्येमुळे मला या लढतीत सरळ सेटमध्ये हार पत्करावी लागली, असे नदालने लढतीनंतर सांगितलेयाआधी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररलाही सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्याला ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमने हरविले. सहाव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सितसिपासने रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा 7-6(7/5), 6-4 असा पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या