खासदार पप्पू यादव यांच्यावर हल्ला, हल्ल्याची माहिती देताना अश्रू अनावर

30

सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर 

बिहारमध्ये मुजफ्फरनगर जिल्ह्यात भारत बंद दरम्यान खासदार पप्पू यादव यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या बद्दल माहिती देताना यादव यांना अश्रू अनावर झाले. ट्विटरवरून त्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना त्यांनी म्हटले की “नारी बचाओ या पदयात्रेदरम्यान भारत बंदच्या नावार काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. कार्यकर्त्यांना जात विचारून त्यांना हाणामारी केली. बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? मुख्यमंत्री नितीश कुमार कुंभकर्णासारखे झोपा काढत आहे,” असा घाणाघात त्यांनी केला. पप्पू यादव यांना व्हाय प्रकारची सुरक्षा आहे, तरी त्यांच्यावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यात आपल्याला सर्व स्तरातून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारत बंदच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवूनही गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचे सांगितले.

आपले सुरक्षा रक्षक नसते तर आपल्याला ठार केले असते असे त्यांनी सांगितले. त्यांई एसपी, आयजी आणि मुख्यमंत्र्यांना फोन केला पण कोणीच त्यांचा फोन उचलला नाही. तसेच जात विचारून लोकांनी हाणामारी केल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या