येरवड्यात जुन्या वादातून दोघांवर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या वादातून दोघांवर वार केल्याची घटना येरवड्यातील राजीवगांधी नगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी इलियास शेख (वय 21) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इलियास हे सोमवारी रात्री 9.30 सुमारास घरी जात होते. त्यावेळी आलेल्या एकाने त्यांना जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी दोघांनी मध्यस्थी करणाऱ्या महादेव मोरे यांच्यासह इलियास यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कवीतके तपास करीत आहेत.