तलावातील पाणी पाजणाऱ्या मेंढपाळावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर 

कच्ची घाटीतील तलावात मेंढ्यांना पाणी पाजणाऱ्या मेंढपाळावर हल्ला करून जखमी करणाऱ्या चौघांना चिकलठाणा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली.

नाशिक जिल्ह्यातील तांबेवाडी येथे राहणारे वैâलास शहादू गोयकर (२५), त्याचे वडील शहादू, हिरामन महादू गोयकर, कुसुमबाई किसन राजाळे आणि हरिभाऊ राजाळे आम्ही सर्व जण महालपिंप्री येथे मेंढ्या घेऊन आलो होतो. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढ्या घेऊन कच्ची घाटीतील तलावात पाणी पाजण्यासाठी आलो, त्यावेळी इंदल किसनसिंग दुल्हत आणि विजय रामप्रसाद मेहेर हे दोघे तिथे आले. तुम्ही या तलावात मेंढ्यांना पाणी कसे पाजता, असा जाब विचारून शिवीगाळ केली. त्यावेळी गोयकर यांनी पाणी पाजू द्या अशी विनंती केली. त्यावेळी त्या दोघांनी आरडाआरोड करून गावातील लोकांना बोलवून घेतले आणि गोयकर या मेंढपाळांवर लाठ्या – काठ्यांनी दगडाने हल्ला केला. यामध्ये कैलास गोयकारचा हात प्रॅâक्äचर झाला, शहादूचे डोके फुटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैâलास गोयकर यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात विलास गलमल महेर (४५), विजय आसाराम चंदवाडे (३५), विजय रामप्रसाद महेर (२७) आणि पूनम रामधन दुल्हत (२० सर्व रा. कच्ची घाटी, ता. संभाजीनगर) यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ ताईतवाले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या विलास महेर, विजय चंदवाडे, विजय महेर आणि पूनम दुल्हत या चौघांना अटक केली. त्या चौघांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील ताडेवाड यांनी अन्य साथीदारांचा शोध घ्यावायाचा आहे, त्यांच्यावर हल्ला करण्याचा काय उद्देश होता, हे जाणून घ्यावायाचे असल्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली असता न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.