सिग्नल तोडणाऱ्याचा वाहतूक पोलिसावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

सिग्नल तोडल्यानंतर जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला जंक्शन येथे घडली. मारहाणप्रकरणी वाकोला पोलिसांनी मेहबूब मूर्तिझा खानला अटक केली.

तक्रारदार हे कुर्ला वाहतूक चौकीत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते रझा जंक्शन येथे कर्तव्यास होते. त्या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचे काम ते करत होते तेव्हा एमटीएनल जंक्शन येथे मोटारसायकलस्वार हा सिग्नल तोडून पुढे गेला असता त्याला तक्रारदाराने रोखले. सिग्नल का तोडून पुढे गेलास अशी तक्रारदाराने मेहबूबला विचारणा केली असता मेहबूबने तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा एक पोलीस शिपाई तेथे आला. त्याने मारहाण करणाऱ्यापासून तक्रारदारांना वाचवले. घडल्या प्रकाराची माहिती बीकेसी आणि वाकोला पोलिसांना कळवण्यात आली. काही वेळात वाकोला पोलीस घटनास्थळी आले. वाकोला पोलिसांनी मूर्तिझाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.