
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज नाशिकमधील तरुणाने बुधवारी मंत्रालयासमोरील प्रवेशद्वारावर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव गजू घोडके असून तो नाशिकचा रहिवाशी तसेच ओबीसी सुवर्णकार समाजाचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र हा विषय न्यायालयीय कचाटय़ात अडकून आगामी महापालिका निवडणुका विनाओबीसी आरक्षण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे घोडके याने सांगितले.
























































