इंडिगोत प्रवाशाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर ते मुंबई विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने चक्क आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार एअर इंडिगो विमानात घडली. मात्र, वैमानिक आणि सहवैमानिक सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

प्रवाशांविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोर्की निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि 336 तसेच एअरक्राफ्ट कायदा 1937 अनुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.