हवेत गोळीबार करीत खूनाचा प्रयत्न; उद्योजक पिता-पुत्रासह आठ जणांवर गुन्हा

व्याजाने पैसे देउन जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून हवेत गोळीबार करत तरूणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उद्योजक पित्रा-पुत्रासहत आठ जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काटेनगर पिंपळेसौदागर येथील 62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड (दोघेही रा. औेंध) दिपक गवारे (रा. डेक्कन) राजू उर्फ अंकुश दादा  सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.  विधाते वस्ती)  इतर दोन महिला अशा आठ जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न, महाराष्ट्र सावकारकी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2020 मध्ये घडली आहे. परिसरात आरोपींची दहशत असल्यामुळे फिर्यादींनी आतापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती.

फिर्यादी ज्येष्ठ महिलेच्या मुलाने आरोपी गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातून रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील जागा स्वतःचे नावावर करून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या मुलाला डिसेंबर २०२० मध्ये घरी बोलावले होते. त्यावेळी नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील पिस्तूलाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर गणेश गायकवाड व दिपक गावारे याने  तरूणाच्या डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने स्टॅम्प, लिहलेले व कोरे पेपरवर सह्या घेतल्या. दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून डेक्कन येथील गवारे याच्या घरी कोंडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या