पीएमसी बँक प्रकरण : ऑडिटर दोषी आढळल्यास आयसीएआय कारवाई करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह  (पीएमसी) बँकेतील अनियमिततेला ऑडिटर जबाबदार असेल. त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) दिले आहेत.

पीएमसी बँकेचा एनपीए अचानक वाढल्याचे निदर्शनास येताच रिझर्व्ह बँकेने व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. बँकेचा एनपीए अचानक कसा वाढला, ऑडिटरने केलेल्या ऑडिटमध्ये ते का दिसले नाही, असा सवाल केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑडिटरची शिखर संस्था असलेल्या आयसीएआयने आरबीआय आणि इतर संबंधित ऍथॉरिटीकडून ऑडिटरच्या भूमिकेबाबतची माहिती मागवली आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास शिस्तभंगाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात येईल, असे आयसीएआयने स्पष्ट केले आहे.