संभाजीनगरातील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

878

घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव रुग्णांपैकी एकाचा आज मृत्यू झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी माहिती दिली. तथापि या विषयीचे डिटेल्स मागितले असता हे डिटेल्स माझ्याकडे अद्याप आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

संभाजीनगरातील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. या दोन्ही रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबडे यांनी दिली. याविषयीचा संपूर्ण अहवाल आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी दैनिक सामना शी बोलताना सांगितले.

या एका व्यक्तीच्या मृत्यूने संभाजीनगर शहरातही कोरोनाचे आता आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती घाटी परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र याविषयी प्रशासनाने मात्र कानावर हात ठेवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या