औरंगाबाद नव्हे, छत्रपती संभाजीनगर स्टेशन

औरंगाबाद रेल्वे स्थानक आता अधिकृतरीत्या ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ झाले आहे. मध्य रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज ही माहिती दिली. औरंगाबाद शहर व जिह्याचे तीन वर्षांपूर्वी नामांतर झाले होते. मात्र रेल्वे स्थानकाचे नाव बदलले नव्हते. त्यात आता बदल झाला आहे. या रेल्वे स्थानकाचा नवा कोड आता CPSN असा असेल.