
झोपेत असलेल्या भावाच्या अंगावर रॉकेल ओतुन पेटवून दिल्याची घटना संभाजीनगरातील बनेवाडीत शनिवारी मध्यरात्री घडली आहे. मुकुंद कुमावत असं या पीडित व्यक्तिचं नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
बनेवाडी परिसरात राहणारा मुकुंद कुमावत हे आपल्या घरात झोपलेला असताना त्याच्या भावाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये तो गंभीररित्या भाजला असून त्याला उपचारासाठी रविवारी पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुकुंदला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र घटनेवेळी नातेवाईक किंवा कुटुंबीय उपस्थित नसल्यामुळे त्याला का जाळले हे समजू शकले नाही.. या घटनेची नोंद वेदांत नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्या तरी मुकुंदला का जाळले, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.
























































