संभाजीनगर – दोन खुनांच्या घटनेने शहर हादरले, मिटमिट्यात भावानेच काढला भावाचा काटा

प्रातिनिधिक फोटो

संभाजीनगर शहरात एकापाठोपाठ दोन खुनांच्या घटनेने खळबळ उडाली असून, मिटमिटा परिसरात एका 40 वर्षीय तरुणाचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून त्याचा मोठा भाऊ अमितकुमार यास ताब्यात घेतले. तर दुसऱ्या घटनेत रांजणगाव परिसरात एका तरुणास तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलयाची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली.

मिटमिटा परिसरातील पिसहोम हाऊसिंग सोसायटी येथील फ्लॅट नं. एच १३ मधील तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत मण्टूस कुमार सिंग उर्फ मॉण्टी (40) हा गेल्या सहा महिन्यांपासून पिसहोममध्ये राहत होता. तीन दिवसांपूर्वी त्याचा मित्र बबलू याने त्याची बोलेनो कार फिरण्यासाठी घेऊन गेला होता. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तो चावी देण्यासाठी मान्टीसिंगच्या घरी आला. घरातून दुर्गंधी येत असल्याने बबलू याने घटनेची माहिती छावणी पोलिसांना दिली. यावरून सहायक आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी श्वान पथक, फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड पथकासह घटनास्थळी धाव घेत दार तोडून आत प्रवेश केला असता त्यांना मान्टीसिंग हा नाइट पॅण्टवर सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याचा पोटात चाकूने वार करण्यात आले होते. भिंतीवर व खाली फरशीवर रक्ताचे डाग पडलेले होते व पोटातून आतडे बाहेर आलेले असल्याचे दिसून आले.

मॉन्टीसिंग खासगी वसुली करत होता..
मयत मॉन्टी हा मूळ बिहार येथील राहणारा असून, तो पँथर संघटनेचे काम करत होता. तसेच तो फायनान्स क्षेत्रातील खासगीरीत्या वसुली सहा प्लॉिंटगचादेखील व्यवसायक करत होता. त्याचे मागील आठ दिवसांपूर्वी भांडण झाल्याने तो एकटा पिसहोम सिटीत राहत होता. त्याला एक सहा वर्षांची लहान मुलगी आहे. दारूच्या नशेत मॉन्टीसिंग याचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संशयावरून मोठ्या भाऊ ताब्यात…
मयताचा मोठा भाऊ अमितकुमार सिंग हा समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष असून, त्याने संस्था चालक पालवे यांना 45 लाखांची खंडणीची मागणी केली होती. यावरून सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी २५ लाखांची खंडणी घेताना अमितकुमार सिंगसह एका रेल्वे कर्मचाऱ्यास अटक केली होती. अमितकुमार सिंग याचा जामीन होऊ नये, यासाठी मयत मॉन्टीसिंग यांने पोलिसांशी पत्र व्यवहारदेखील केला होता. त्यामुळे अमितकुमार सिंग हा सात महिने हर्सूल कारागृहात होता. लाकडाऊनच्या काळात त्याची जामिनावर सुटका झाली होती. वडिलोपार्जित संपत्तीवरून दोघा भावात वाददेखील होता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून अमितकुमार यास ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या