औसा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील ४४ वर्षीय चंद्रकांत नागोराव साठे यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आज सकाळी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. सोयाबीनचा अल्प उतारा आला, मशागत बियाणे, खते, मजुरीचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कशी फेडायची या विवंचनेत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई असा परिवार आहे

चंद्रकांत साठे यांची शेती सारोळा शिवारात 3 एकर आहे. या वर्षी सोयाबीन पिकावरती गोगलगायी पडल्यामुळे उत्पन्न झाले नाही आणि पाऊस वेळेवर नसल्यामुळे खर्च भरपूर झाला आणि उत्पन्न अपेक्षित मिळाले नाही. फायनान्सचे दोन लाख ५० हजारांचे व औसा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे दीड लाख व खाजगी देणी कशी फेडायची हा प्रश्न समोर होता. साठे यांनी त्या नैराश्येतूनच आत्महत्या केली आहे.

summary- ausa farmer commits suicide