
मेलबॉर्न – ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण जंगलात सप्टेंबर 2019 पासून भडकलेल्या वणव्यानंतर उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा झळा आता थेट २० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रचंड धुराचे लॉट ,अजूनही धुमसणारी आग यामुळे ऑस्ट्रेलियन पोण टेनिस स्पर्धा जेथे होणार आहे व्हिक्टोरियातील मेलबॉर्न शहराला प्रचंड उष्णता आणि धुराच्या प्रदूषणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे या स्पर्धेला येणाऱ्या जगातील स्टार टेनिसपटूंच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खेळाडूंना जपणे आणि लढती वेळेत पार पाडण्याचे मोठे आव्हान स्पर्धा संयोजकांपुढे आहे.
ऑस्ट्रेलियातील भीषण वणवा ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांतील एकूण 1 कोटी 89 लाख एकर जंगल जाळून खाक झाले आहे. त्यात 2 हजार घरे भस्मसात झाली असून 26 नागरिक आणि 48 कोटी पशु पक्षांचे जीव आगीने घेतले आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी असे भयानक वणवे नियंत्रणात आणण्यासाठी नॅशनल बुशफायर एजन्सीचे गठन केले आहे. या एजन्सीच्या कामासाठी 14 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे


























































