दोन बहिणी एक प्रियकर; गरोदरही एकत्रच रहायचं, मात्र लग्न बेकायदेशीर

जुळे म्हटलं की बऱ्याचदा प्रत्येक गोष्टी सारख्या लागतात. लहानपणापासून सगळं काही एकमेकांना शेअर करत असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी प्रियकरही एकच निवडला असून त्याच्यासोबत लग्न करून एकत्रच गरोदर राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र देशातला कायदा यांच्या लग्नाच्या आड येत असल्याचे दिसून येत असल्याने त्या तणावात आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी अॅना आणि लूसी डिसींक या दोघी जुळ्या बहिणी असून त्या सगळ्या गोष्टी नेहमी एकमेकांना शेअर करत आल्या आहेत आणि त्यापेक्षा कहर म्हणजे या दोघींचा बॉयफ्रेण्डही एकच आहे. या दोन्ही बहिणी काही दिवसांपूर्वी टीएलसी एक्स्ट्रीम सिस्टर्स नावाच्या शो मध्ये आल्या होत्या. जगात अगदी एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्या दोघी सगळ्या गोष्टी एकत्र करतात. एवढेच नाही तर दोघींनाही एकत्रच गरोदर राहण्याची इच्छा आहे.

लूसी आणि अॅना एकत्र खातात, एकसारखे कपडे घालतात, एकत्र व्यायाम करतात, एकत्र आंघोळ करतात यापेक्षा भयंकर म्हणजे या वॉशरुमलाही एकत्र जातात त्यामुळे त्यांच्यात कुठल्याच प्रकारचे अंतर नाही. बेन असे दोघींच्या प्रियकराचे नाव असून चाळीस वर्षाचा बेन त्यांच्यासोबतच राहतो. दोघींचे म्हणणे आहे की त्या दोघींना एकाच वेळी गरोदर राहायचे आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील एक कायदा त्यांच्या लग्नाच्या आड येत आहे.

लूसी आणि अॅना यांची 2021 साली बेनसोबत ओळख झाली आहे. व्यवसायाने मेकॅनिक असलेल्या बेनला पाहताक्षणी दोघी बहिणी त्याच्या प्रेमात पडल्या. ऑस्ट्रेलिया मॅरिज अॅक्ट 1961 नुसार एक माणूस दोन लग्न करू शकत नाही. याची खंत त्यांनी एका रिअॅलिटी टिव्ही शोमध्ये बोलून दाखवली. यावेळी दोघीही भावुक झाल्या होत्या. कारण दोघीही कधीपासून लग्न करण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टिव्ही होस्ट डेव व्ह्यूजसोबत बोलताना या दोघींनी सांगितले की आम्ही दोघी जुळ्या आहोत आम्ही आमचा जोडीदार बेन याच्यासोबत लग्न करू इच्छित आहोत मात्र ऑस्ट्रेलियातील कायदा अशा लग्नाला बेकायदेशीर मानत असल्याने सध्या आम्ही तणावाखाली वावरत आहोत.

लूसीने याबाबत सांगितले की जोडीदार एकच असल्याचे कारण म्हणजे आम्ही कायम एकमेकींसोबत राहू शकतो आणि आमच्या नात्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. तसेच बेन या गोष्टीची चांगली काळजी घेतो आणि आम्हा दोघींनाही तो आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या चर्चे दरम्यान लूसी आणि अॅना सांगतात की आम्ही सुरुवातीला सांगितले आहे की आम्ही एकत्रच येणार, आमच्यापैकी एकीची निवड तो करू शकत नाही. मात्र बेनचे उत्तर ऐकून त्या दोघीही खुश झाल्या. बेनने त्यांना सांगितले होते की दोघी बहिणींचे एकमेकींवरचे प्रेम तो समजू शकतो. त्यामुळे दोघींसोबत नाते ठेवायला त्याला काहीच हरकत नाही. सुरुवातीला थोडा तो नर्व्हस होता मात्र आता सगळ्या गोष्टी बदलल्या असून सगळं काही सुरळीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या