Photo – लग्नाआधीच ‘बाबा’ झालेल्या नंबर वन क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकला

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स लग्नाच्या बेडीमध्ये अडकला आहे. कमिन्सने सोमवारी सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.

पॅट कमिन्स याने प्रेयसी बॅकी बॉस्टन हिच्यासोबत सात फेरे घेतले. लग्नाचा फोटो शेअर करत त्याने ‘Just Married’ असे कॅप्शन दिले आहे.

29 वर्षीय पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार असून जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याच्या क्रिकेटपटूंसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

पॅट कमिन्स आणि बॅकी बॉस्टन गेल्या आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. 2020 मध्ये दोघांनी साखरपुडाही उरकून घेतला होता.

कोरोनामुळे दोघांचे लग्न लांबणीवर पडले होते. दोघांना एक मुलगाही असून त्याचे नाव एल्बन असे आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याचा जन्म झाला होता.

बॅकी बॉस्टन ही मूळची इंग्लंडची असून इंटेरियर डिझायनर आहे. ती एक ऑनलाईन स्टोअरही चालवते. होम फर्निशिंगसंबंधी वस्तुंची ती विक्री करते.