फेडररला सॅण्डग्रेनने पाच सेटपर्यंत झुंजविले

222
Melbourne: Switzerland's Roger Federer makes a forehand return to Tennys Sandgren of the U.S. during their quarterfinal match at the Australian Open tennis championship in Melbourne, Australia, Tuesday, Jan. 28, 2020. AP/PTI(AP1_28_2020_000015B)

तब्बल 20 ग्रॅण्डस्लॅम पदके जिंकण्याचा अनुभव असलेला सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत मंगळवारी अमेरिकेच्या टेनिस सॅण्डग्रेनने विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजविले. आता उपांत्य लढतीत त्याची गाठ सर्बियाच्या नोवाक जोकोविच याच्याशी पडेल.

तृतीय मानांकित फेडररने 3 तास 31 मिनिटांपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत शंभराव्या मानांकित सॅण्डग्रेनचे कडवे आव्हान 6-3, 2-6, 2-6, 7-6(8), 6-3 असे मोडीत काढत कारकीर्दीत 15 व्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. 2018नंतर प्रथमच फेडरर अंतिम चारमध्ये दाखल झाला आहे. दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने कॅनडाच्या मिलोस राओनिकला 6-4, 6-3, 7-6(1) असे हरवत उपांत्य फेरी गाठली. आता फेडरर आणि जोकोविच 50व्यांदा एकमेकांना भिडणार आहेत.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत 14 व्या मानांकित अमेरिकेच्या सोफिया केनिनने टय़ुनिशियाच्या वन्स जॅब्यूरचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टी हिने आठव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा हिचा 7-6(8), 6-2 असा पाडाव करून आगेकूच केली.

आपली प्रतिक्रिया द्या