सामना ऑनलाईन
349 लेख
0 प्रतिक्रिया
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘जलजीवन ‘च्या कामांची चौकशी करा ; खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी
जिल्ह्यात आदिवासी, दलित वस्ती भागातही जलजीवन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजना पूर्ण झालेल्या नाहीत. केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेच्या संचालकपदाच्या अधिकाऱ्यांच्या केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून...
शनिशिंगणापूर-राहुरी महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात ; सोनईत व्यावसायिकांनी स्वतःच घेतला पुढाकार
जिल्हा मार्ग, राजमार्ग व राष्ट्रीय महामार्ग सोनईमधून जात आहे. या महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते नेवासा व राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अहिल्यानगर...
खोल खोल पाणी ,विहिरी तळाशी; जिल्ह्यात पाणीबाणी
उन्हाचा कडाका सातत्याने वाढू लागल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलमध्ये खडखडाट झाला आहे. काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण...
उन्हाचा कडाका वाढला, पुरेशी काळजी घ्या! महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या...
लाडक्या बहिणींचे पैसे वळविले कर्ज खात्यात, अजित नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन; न्याय मिळवून...
लाडक्या बहिणीच्या नावावर आलेले पैसे अजित नागरी सहकारी पतसंस्थेने कर्ज खात्यात वळती करून घेतल्यामुळे संतप्त महिलांनी सहकार आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेने पुढाकार घेऊन...
गेट वे हून जेएनपीएला चला 35 मिनिटांत; स्पीड बोटीची शुक्रवारी ट्रायल
गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीएपर्यंत आता फक्त 35 ते 40 मिनिटांत पोहोचता येणार आहे. त्यासाठी लवकरच दोन अत्याधुनिक स्पीड बोटी धावणार असून त्याची ट्रायल...
शहापुरातील आदिवासींचा खर्डीत ‘बि-हाड मोर्चा’ रणरणत्या उन्हात 6 किमी पायी धडक
सुविधांसह वन दावे मंजूर करून वनपट्टे देण्यात यावेत, दहिगाव ते बेलनाला रस्त्यावरील पूल, मोऱ्या व साकाव टाकून रस्त्याचे काम करावे यासह विविध मागण्यांसाठी शहापूर...
पोलीस डायरी – पोलिसांनो, गुलाम नको, ‘सिंघम’ व्हा!
>> प्रभाकर पवार
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या चिंचवड येथील केंदूर घाटात दरोडेखोरांनी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न...
विजयदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त तोफगाडा लोकार्पण सोहळा; शिवप्रेमींचा जल्लोष
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ...
Throt Infection – खवखवणाऱ्या घशावर खात्रीशीर घरगुती रामबाण उपाय, वाचा सविस्तर
बदलत्या हवामानानुसार शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. मार्च महिना सुरु झाला आहे. दिवसा गर्मी रात्री गारवा असे वातावरण आहे. उष्ण तापमान वाढू लागले आहे....
Photo – निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज
बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल सई ताम्हणकरने निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तीच्या या...
हाफिज सईदचा साथीदार अबू कतालची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या
लष्कर ए तोयबाचा दहशदवादी आणि हाफिज सईदचा विश्वासू सहकारी अबू कतालची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरमधल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अबू...
परीक्षण – थरारक आणि रक्त गोठवणारं!
>> तेजस पोळ
आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. धाप लागेल इतक्या वेगाने विदा (डेटा) आणि माहिती निर्माण होत आहे आणि त्यावर प्रािढया केली जाऊन...
सूर-ताल – ताल से ताल मिला
>> गणेश आचवल
गिरगाव आणि विविध उत्सव यांचं नातं अतूट आहे. 1990च्या दशकात गिरगावात गणेशोत्सवातून अनेक वाद्यवृंद किंवा सांगितिक मैफली सादर व्हायच्या. अरुण लळीत यांचा...
सत्याचा शोध – दृष्ट… एक लागणे
>> चंद्रसेन टिळेकर
नजर लागणे, दृष्ट लागणे आणि त्यामुळे काहीतरी अनिष्ट घडणे, कुणीतरी आपल्यावर `करणी' केली आहे असा ग्रह करून घेणे या अंधश्रद्धा गाडल्या तरच...
सोहळा – संत तुकाराम महाराजांचे शेतीविषयक प्रबोधन
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
सोळाव्या शतकातील परकीय राजवटीच्या काळात पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचार मांडून सामाजिक ाढांती घडवून आणणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकोबारायांच्या सूक्ष्म नजरेतून सामाजिक...
स्वयंपाकघर – रंग चवीचे
>> तुषार प्रीती देशमुख
ऐन उमेदीच्या वयात संसार एकटीने चालवण्याची वेळ आली तरी न खचता पतीने सुरू केलेल्या मसाल्यांच्या दुकानातील दुनियेत त्या रमल्या. मसाल्यांच्या प्रत्येक...
किस्से आणि बरंच काही – कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन
>> धनंजय साठे
आजच्या सुपरफास्ट युगात आपण कितीतरी आनंदाच्या क्षणांना मुकत आहोत.
छोटे-छोटे आनंदाचे क्षण हरवल्यासारखे वाटतात. जगण्यातील ती निरागसता, ते अप्रूप आणि सुखाची ऊब...
मागोवा – म्हणे, महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य!
>> आशा कबरे-मटाले
महिला दिनी `महिला सुरक्षेच्या प्राधान्या'चा ठणाणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याकडे एका इस्त्रायली पर्यटक महिलेसह अन्य एका भारतीय महिलेवरील बलात्काराची बातमी झळकते, ही...
साहित्य जगत – अष्टावधानी
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुण्याचे डॉ. अशोक कामत म्हटलं की लेखक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक कार्यकर्ते, फर्डे वत्ते अशी त्यांची बहुविध ओळख सांगता येईल. वयाच्या 83...
संस्कृती-बिंस्कृती – बाजबहादूर-रूपमती आणि लव्ह जिहाद
>> मुकुंद कुळे
माळव्याचा सुलतान बाजबहादूर आणि त्याची राणी रूपमती यांचं प्रेम माळव्याच्या भूमीतील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमकथा. आजही त्यांच्या प्रेमाची कथा रंगवून सांगितली जाते. मात्र...
अभिप्राय – जिव्हाळ्याने रेखाटलेली शब्दचित्रे
>> राहुल गोखले
सुमारे पस्तीस वर्षे प्राध्यापक म्हणून आणि जवळपास पाव शतक एका प्रथितयश वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करणारे सुहास बारटक्के यांना प्रवासाची अतिशय...
वाचावे असे काही – सारस्वत जगतावर तिरपा कटाक्ष
>> धीरज कुलकर्णी
1940 ते 50 चे दशक भारतासाठी फार महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ जोमात होती. जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग पसरलेले. महागाई, रेशनिंग यांचा...
महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदने
राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येऊनदेखील या...
कानिफनाथांच्या जयघोषात मढीत होळी उत्सव
कानिफनाथांचा जयघोष करत मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवण्यात आली. पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. होळी...