सामना ऑनलाईन
3514 लेख
0 प्रतिक्रिया
गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्यास उमेदवारीवर गंडांतर येणार; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत मोठा निर्णय दिला. उमेदवाराने नामांकन पत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्यास...
नक्षलविरोधी मोहिमेवर असलेल्या जवानांवर मधमाशांचा हल्ला, 20 जण जखमी; चौघांची प्रकृती गंभीर
नक्षलविरोधी मोहिमेवर निघालेल्या जवानांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत 20 जवान जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी...
Mumbai News – रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 9 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर...
Mumbai News – दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमान सेवा विस्कळीत
दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याने विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे देशांतर्गत आणि...
जकार्तामध्ये मशिदीत भीषण स्फोट, 54 जण जखमी; सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश
शाळेच्या कँपसमधील मशिदीत नमाज पठण सुरू असताना भीषण स्फोटाची घटना शुक्रवारी इंडोनेशियातील जकार्तामध्ये घडली. या स्फोटात 54 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा...
केवळ पत्नीच्या पालकांच्या जबाबाच्या आधारे पतीला दोषी धरु शकत नाही; कौटुंबिक छळाच्या प्रकरणात हायकोर्टाचा...
विवाहित महिलेच्या होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या पार्श्वभूमीवर एका प्रकरणात पती व सासू-सासऱ्यांना दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवले आहे. केवळ पत्नीच्या आई-वडिलांच्या जबाबाच्या...
चारपैकी तीन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज फेटाळले, अमेरिकेनंतर आता कॅनडाने दिला झटका
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एकेकाळी हक्काचे ठिकाण असलेल्या कॅनडाच्या कठोर धोरणाचा फटका जगभरातील विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेषतः कॅनडाने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार,...
मिलॉर्ड, मला हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनवा…! याचिकेवर न्यायालय भडकले, दंड ठोठावण्याचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. जी. व्ही. श्रवणकुमार नावाच्या याचिकाकर्त्याने स्वतःला तेलंगणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनवण्याची मागणी केली होती. ही व्यवस्थेची थट्टा असल्याची संतप्त...
कच्च्या तेलाच्या उत्पादनाला ब्रेक लागणार! आठ देशांच्या निर्णयाचा हिंदुस्थानवर थेट परिणाम
पेट्रोल, डिझेलच्या किमती येत्या काळात चिंता वाढवणार आहेत. जगातील 22 प्रभावशाली तेल उत्पादक देशांच्या समूहाने म्हणजेच ‘ओपेक’ने असे पाऊल उचललेय, ज्याचा परिणाम थेट हिंदुस्थानावर...
देशातील एक टक्का श्रीमंतांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत असलेल्या केवळ एक टक्का श्रीमंत लोकांच्या संपत्तीत तब्बल 62 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. नोबेल...
फिलिपिन्समध्ये चक्रीवादळामुळे लाखोंच्या कार कचऱ्यात!
फिलिपिन्समध्ये आलेल्या चक्रीवादळ टिनोने प्रचंड नुकसान केले आहे. 220 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने समुद्रकिनारी पाच फुटांपर्यंत लाटा उसळल्या. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला आहे....
सोनाक्षी साऊथ इंडस्ट्रीजवर फिदा
दाक्षिणात्य अभिनेता सुधीर बाबू आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगामी ‘जटाधरा’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. तेलुगु इंडस्ट्रीजमध्ये सोनाक्षीचा हा पहिलाच चित्रपट आहे....
टॅरिफवरून ट्रम्प सरकारला अमेरिकेच्या कोर्टात आव्हान
1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्यांतर्गत टॅरिफ लादण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आहे की अमेरिकन काँग्रेसला, यावर महत्त्वाचा युक्तिवाद बुधवारी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात होणार...
अमेरिकेतील शटडाऊनमुळे नोकऱ्या धोक्यात
अमेरिकेतील सरकारी शटडाऊनला आता 35 दिवस पूर्ण झाले आहेत. या शटडाऊनचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होत आहे. हवाई प्रवास ठप्प झाला असून एअर ट्रॅफिक कंट्रोलर...
श्रीलंकेकडून 35 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक
श्रीलंका नौदलाने 35 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली आहे. तसेच चार बोटीसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. जाफना जिह्यातील कांकेसंथुराई क्षेत्रात ही अटक करण्यात आली आहे....
नेपाळमध्ये हिमस्खलनात 7 गिर्यारोहकांचा मृत्यू
नेपाळमधील यालुंग री शिखरावर हिमस्खलन झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये तीन अमेरिकन, एक कॅनेडियन, एक...
दिल्लीकर प्रदूषण आणि धुक्याच्या समस्येने त्रस्त
दिल्लीत दिवाळीच्या 14 दिवसांनंतरही प्रदूषण कमी झाले नाही. दिल्लीत सध्या प्रदूषण आणि धुक्याने नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. दिल्लीतील एक्यूआय पातळी अजूनही गंभीर...
आठव्या वेतन आयोगाच्या अटी-शर्तींना मान्यता
केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटी आणि शर्तींना औपचारिक मान्यता दिली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने एका राजपत्र अधिसूचनेद्वारे दिली आहे. नव्या वर्षात...
जगज्जेत्या क्रिकेटपटूंची ‘ब्रॅण्ड पॉवर’ वाढली, जेमिमा रॉड्रिग्जचे मानधन 100 टक्क्यांनी वाढले
जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरून इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’त मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रविवारी नवी मुंबईत दक्षिण...
विमान पाडण्याचा इशारा हारिसला महागात पडला, हिंदुस्थानविरुद्धच्या वादग्रस्त कृतीवर आयसीसीकडून दोन सामन्यांची बंदी
क्रिकेटच्या मैदानावर भावना उफाळतात, पण काही वेळा त्या सीमारेषाही ओलांडतात. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने भावनेच्या भरात 21 सप्टेंबरला कोलंबो येथे झालेल्या आशिया कप...
तीन रणरागिणींचा वर्ल्ड कपवर ठसा, आयसीसीच्या वर्ल्ड कप संघातही हिंदुस्थानचा झेंडा फडकला
आयसीसीने महिला क्रिकेट वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंचा सर्वोत्तम संघ जाहीर केला असून त्यात हिंदुस्थानच्या तीन रणरागिणींना स्थान देण्यात आले आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज...
खेळण्याआधीच अश्विनने गुडघे टेकले
हिंदुस्थानी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन बीबीएलमध्ये खेळणार असल्याची चांगलीच हवा निर्माण झाली होती. पण त्याआधीच अश्विनच्या गुडघ्याच्या संपूर्ण बिग बॅश लीग हंगामातून बाहेर पडले आहेत....
मिनी लिलाव पुन्हा हिंदुस्थानात
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 13 ते 15 डिसेंबरदरम्यान हिंदुस्थानात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा लिलाव परदेशात झाला होता. लिलावासंदर्भात बीसीसीआयने सर्व दहा...
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा अहेर; खरेदी केंद्रांवरून...
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा...
के. एल. राहुलच्या ट्रान्स्फर चर्चांना विराम
आयपीएल 2026 पूर्वी सुरू असलेल्या खेळाडूंच्या ट्रेडिंग चर्चांमध्ये दोन मोठ्या नावांबाबत स्पष्टता आली आहे. वॉशिंगटन सुंदर आणि के. एल. राहुल हे दोघेही सध्याच्या फ्रेंचायझीतच...
निवडणूक जाहीर होताच आरोग्य योजनांची खैरात, महात्मा ज्योतिराव फुले योजनेत आजारांची संख्या वाढवली
निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 21 निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत...
पुण्यातील रस्त्यावर पुन्हा रक्ताचा सडा, भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून संपवले
शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खुनानंतर पुण्यात गँगवार भडकले आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून,...
व्यावसायिकाच्या घरी चोरी प्रकरणी मोलकरीण ताब्यात
व्यावसायिकाच्या घरी 19 लाखांचे दागिने चोरीप्रकरणी मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हे कांदिवलीत राहतात. त्यांच्याकडे दोन महिला मोलकरीण कामाला आहेत. अटक केलेल्या महिलेकडे...
मालाडमध्ये तोतया पोलिसाला अटक
गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल प्रशासनाची फसवणूक करणाऱ्याला बांगूर नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकाश ज्ञानदेव जाधव उैर्फ पक्या असे त्याचे नाव आहे. मालाडमधील...
क्लार्कची त्वचेच्या कर्करोगाशी जीवघेणी लढाई
कधी मैदानावर तलवारीसारखा चमकणारा, कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मायकल क्लार्क आज एका अशा प्रतिस्पर्ध्यासमोर उभा आहे, ज्याला ना बाऊन्सर आहे, ना सीमारेषा....




















































































