सामना ऑनलाईन
538 लेख
0 प्रतिक्रिया
Rain Update: मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला ०.२५ मिटरने ६ वक्र दरवाजे उघडले
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मांजरा प्रकल्पाचे सहा वक्र दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.
मांजरा...
Marathwada Rain Update: उदगीर तालुक्यातील धडकनाळ, बोरगावात पाणी शिरले
लातूर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला असून जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. उदगीरच्या लेंडी या उप नदीला पूर आला असून पुराचे पाणी धडकनाळ बोरगाव...
Mumbai Rain: मुंबईसाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
देशाच्या हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी १८ आणि १९ ऑगस्ट, २०२५ रोजी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या दोन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात...
मराठवाड्यात पावसाचा कहर; मुक्रमाबाद येथे अनेक गावांचा संपर्क तुटला, NDRF जवानांना पाचारण, मदत कार्य...
रविवारी मध्यरात्री ढगफुटी होऊन पाच तास मुक्रमाबाद सह परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे तर केंद्री, लेंडी, तेरू या नद्यांना...
मराठवाड्यात मुसळधार; औंढ्यातील आदिनाथ मंदिरात पाणी शिरले
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरात पावसाचे पाणी शिरले आहे. पावसाचे पाणी मंदिरात तीन ते चार फूट शिरल्याने शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘बेल्जियन शेफर्ड’ची एण्ट्री
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या संरक्षण क्षमतेत भर घालत, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे प्रशिक्षित स्निफर डॉग बेल्जी आजपासून अधिकृतपणे सेवेत दाखल झाले आहेत. 28 आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण...
महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात तयार
आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम...
हिंदुस्थानी वंशाची कृशांगी मेश्राम यूकेमधील सर्वात तरुण सॉलिसिटर, वयाच्या २१ व्या वर्षी मोठी कामगिरी
हिंदुस्थानी वंशाच्या कृशांगी मेश्रामने नुकतीच एक मोठी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षी ती इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात तरुण सॉलिसिटर (वकील) बनली आहे....
नेवाशात फर्निचरच्या दुकानाला आग; पाच जण आगीत ठार
नेवासे फाटा रोडवरील आहिल्यानगर परिसरातील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत पाच जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व एक पुरूष व दोन...
अहिल्यानगर झेडपीत होणार चार हजार गुरुजींच्या बदल्या; संवर्ग-दोनमधील 1237 शिक्षक
अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. संवर्ग एक व संवर्ग दोनच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात...
‘एलसीबी’मध्ये ‘नवा दम’; मक्तेदारी मोडीत, 39 नव्या अंमलदारांची नियुक्ती
वर्षानुवर्षे स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) ठाण मांडून बसलेल्या काही मोजक्या अंमलदारांच्या ‘मक्तेदारी’ला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘हुजरेगिरी’ आणि ‘राजकीय...
अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सोलापूरला 40 कोटींचा निधी
एप्रिल आणि मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिह्यातील 32 हजार 761 शेतकऱयांच्या 22 हजार 196.81 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या बाधित...
अहिल्यानगर: रस्त्यांची चाळण; अहिल्यानगरकरांचा जीव मुठीत
अहिल्यानगर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली रस्त्यांची कामे अद्यापि पूर्ण झाली नाहीत. कोटय़वधी रुपये खर्च करूनसुद्धा रस्त्यांवर फक्त खड्डेच...
पथनाट्यातून अंतिम व्यक्तीपर्यंत कृष्णाचा विचार नेण्याचा अनोखा प्रयत्न, स्वाध्याय परिवाराची गेल्या २३ वर्षांची परंपरा
वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रणेते पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने, स्वाध्याय परिवार जन्माष्टमीचा उत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. या वर्षीही देशातील आणि...
आधार नागरिकत्वाचा पुरावा म्हणून स्वीकारता येणार नाही: सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशाच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) भूमिकेचे समर्थन केले की आधारला नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही. नागरिकत्वासाठी स्वतंत्र पडताळणी आवश्यक असल्यावर...
‘मोदींच्या मित्राची’ हिंदुस्थानविरोधात खेळी? अमेरिका-चीन ‘टॅरिफ’ला ब्रेक; ९० दिवसांची वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकमेकांविषयी मैत्रीची भाषा कायम चर्चेचा विषय बनते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये मात्र चित्र बरेच बदलले...
नांदेड: राज्य सरकारच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात प्रचंड जनआक्रोश! शिवसेनेच्या आंदोलनाने शहर दणाणून सोडले
राज्य सरकारच्या भ्रष्ट व वादग्रस्त वक्तव्य करणार्या मंत्र्यांच्या विरोधात आज नांदेड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर जोरदार शिवसेना स्टाईल...
वांद्रेतील डबेवाला भवन लवकरच खुले होणार; पर्यटकांना जवळून अनुभवता येणार डबेवाल्यांचा इतिहास
वक्तशीरपणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची हक्काची सुसज्ज वास्तू अर्थात ‘डबेवाला भवन’चे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. वांद्रे येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ नावाने...
‘चिपळूण-गुहागर मार्गावरील खड्ड्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा
चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी परिसरातील खड्ड्यांची दुरवस्था पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) खड्ड्यातच उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. या खड्ड्यांमुळे नुकत्याच झालेल्या अपघातात...
भाजपमधील मराठा नेत्यांना फडणवीसांचा त्रास; जरांगे-पाटील यांचा दावा
भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत...
आयुक्तांचा शिस्तीचा धडा, पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे!
पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशी सौजन्याने वागा आणि पोलिसांची प्रतिमा सुधारा, अशा सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी...
ढोलताशांचा गजर… गुलालाची उधळण… तरुणाईचा जल्लोष… गणरायांच्या आगमनाने लालबाग, परळ गजबजले!
गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिल्याने रविवारी लालबाग, परळ परिसरात गणरायांच्या आगमनाचा प्रचंड उत्साह दिसला. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईच्या जल्लोषात मुंबई शहर...
मार्मिकचा बुधवारी 65 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
स्थळ: रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
वेळ: सायंकाळी 6 वाजता
महाराष्ट्रभूमीतच मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केले....
गणपतीला कोकणात जायचे कसे? रेल्वे फुल्ल… बससाठी तीन हजार विमानाचे तिकीट बारा हजारांवर
गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढे प्रवासाचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. नियमितसह जादा रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याने पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्तमंडळींची मोठी पंचाईत...
शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीत; पण शिवाजी पार्कातील महाराजांचा पुतळा काळोखात
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आणि शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवून देणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला...
निवडणूक आयोगाने देशातील मुक्त व निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली! आदित्य ठाकरे यांचा हल्ला
निवडणूक आयोगाने देशातील मुक्त व निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. आयोगाकडून देशातील...
गणेशोत्सव मंडळांची ’रंगशारदा’मध्ये उद्या बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
मुंबई-महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेला गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. असे असतानाही पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीत. त्या...
Trump Tariff: Amazon, Walmart, Target यांनी हिंदुस्थानकडून ऑर्डर थांबवल्या; सूत्रांची माहिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वस्तूंवर ५० टक्के कर (tariff) लावल्यानंतर वॉलमार्ट (Walmart), ॲमेझॉन (Amazon), टार्गेट (Target) आणि गॅप (Gap) यांसारख्या प्रमुख अमेरिकन...
नेतन्याहू गाझाचा ताबा घेणार; इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटने योजनेला दिली मंजुरी
इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझा शहराचा ताबा घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या कार्यालयाने दिली. शुक्रवारी सकाळी घेतलेल्या या निर्णयामुळे हमासच्या...
भाजपकडून आदिवासींच्या प्रश्नांकडे दूर्लक्ष; राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा, ईशान्येतील राज्यांमध्ये पक्षाला मोठा फटका
नागालँडचे मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्मोहोनलुमो किकोन यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. सार्वजनिक जीवनात नवीन संधी शोधण्याच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे...