राममंदिरात नोकरी लागताच ऑटोचालक बनला कोट्यधीश, टिन्नू ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या जवळचा; मंदिर निर्माण प्रभारीचा पुतण्याही संशयाच्या भोवऱ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातून तब्बल 200 कोटी रुपयांची देणगी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंदिरात भाविकांनी देणगी दिलेल्या नोटा मोजणारे 50 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून मंदिर ट्रस्टचे कर्मचारी रामशंकर यादव ऊर्फ टिन्नू यांच्या घरात कोट्यवधींचे सोने सापडले आहे. टिन्नू राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या जवळची व्यक्ती असून चंपत राय यांनीच टिन्नू यांना राममंदिरात कामावर ठेवले आहे. टिन्नू हे आधी ऑटोचालक होते, परंतु अवघ्या चार-पाच वर्षांत ते कोट्यधीश बनल्याचे तपासातून समोर आले आहे.

टिन्नू हे अयोध्येत ऑटो चालवण्याचे काम करायचे. तसेच शहरात बाइकवरून फिरायचे. चंपत राय यांच्याकडे टिन्नू यांनी ड्रायव्हर म्हणूनही काम केलेले आहे. टिन्नू यांनी चार ते पाच वर्षात अयोध्येत अनेक भूखंड खरेदी केले आहेत. तसेच 6 पेक्षा जास्त रेस्टॉरेंटमध्ये भागीदारी केली आहे. एकेकाळी ऑटोचालक असलेल्या टिन्नू यांच्याकडे 50 कोटींहून जास्त स्थावर मालमत्ता आहे. टिन्नू यांच्याकडे सुरक्षेचे व्यवस्थापन आणि देणग्या बँकेत जमा करण्याचे काम होते. टिन्नूप्रमाणे मंदिर निर्माण प्रभारी गोपाल राव यांचे पुतणे असलेले सोमेश आनंददेखील संशयाच्या घेऱ्यात आहेत.