2021 Force Gurkha ‘या’ दिवशी होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स

हिंदुस्थानात परवडणाऱ्या ऑफ-रोड एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra Thar नंतर 2021 Force Gurkha सतत चर्चेत असते. कंपनीने अलीकडेच ही कार सादर केली आहे. Force Gurkha हिंदुस्थानात आपली नवीन कार अधिकृतपणे 27 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. त्यानंतर याची बुकिंग देशभरात सुरू होणार आहे. आज आपण याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ही फोर्स गुरखाची सेकेंड जनरेशन एसयूव्ही आहे. यात कंपनीने अनेक अपडेट केले आहेत. ज्यात इंटिग्रेटेड एलईडी डीआरएलसह गोलाकार हेड लाइट आणि बोल्ड गोरखा लेटरिंगसह री-डिझाइन केलेले ग्रिल देण्यात आले आहेत. याच्या पुढील आणि मागील बाजूस असलेले ब्लॅक-क्लॅड बंपर आणि मोठे व्हील याला रफ लूक देतात.

फोर्स गुरखा एसयूव्हीच्या नवीन इंटीरियरला ब्लॅक थीम देण्यात आली आहे. जी पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक असेल. अपडेट गुरखा मध्ये सर्वात मोठे बदल हे इंटीरियरमध्येच करण्यात आले आहे. ज्यामुळे वाहन अधिक प्रीमियम ब्लॅक थीमसह रीफ्रेश दिसते. यात बेंच सीट ऐवजी मागील बाजूस कॅप्टन सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सुसज्ज सात इंच इन्फोटेनमेंट स्क्रीनही देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त फोर्स गुरखामध्ये स्टीयरिंग व्हील आता तीन-स्पीक देण्यात आली आहे.

इंजिन आणि पॉवर

नवीन फोर्स गुरखामध्ये 2.6-लिटर फोर-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले आहे. हे इंजिन 90 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

आपली प्रतिक्रिया द्या