
आपण नवीन कार खरेदी करायचा विचार करत असला. तर आज आम्ही तुम्हाला याशीच संबधित महत्वाची माहिती सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला कार खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती सांगणार आहोत.
टेस्ट ड्राइव्ह नक्की करा
जेव्हा आपण कोणती कार खरेदी करणार आहात, हे निश्चित केल्यानंतर कार खरेदी करण्यापूर्वी त्याची टेस्ट ड्राइव्ह नक्की करा. आजकाल आपण कारची ड्राइव्ह टेस्ट ऑनलाइन बुक करू शकता. यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाही. ड्राइव्ह टेस्ट केल्यानंतर आपल्याला कारच्या परफॉर्मन्स बद्दल अंदाज येऊ शकले.
मॉडेल आणि व्हेरिएंटबद्दल माहिती घ्या
जेव्हा आपण एखादी कार खरेदी करतो त्यावेळी त्या कारचे अनेक मॉडेल असतात. वेगवगेळ्या मॉडेलचे फीचर्सही वेगळे असतात. अशातच आपण आपल्या कारमध्ये कोणते फीचर्स हवे याचा विचार करा. तसेच कार खरेदी करताना संबंधीत कारच्या मॉडेलमध्ये ते फीचर्स आहेत की नाही याची योग्य माहिती घ्या.
मोलभाव करा
कोणत्याही कारची निश्चित किंमत नसते. अशातच आपण जेव्हाही कार खरेदी करण्यास जाल तेव्हा मोलभाव करू शकता. आपण कार विक्रेत्यांकडे आपल्या पसंतीच्या सौद्यांची मागणी करू शकता. आपणास असे वाटते की कारसाठी अधिक किंमत मागितली जात आहे, तर आपण डील रद्द करू शकता. आपण आपल्या इच्छित डीलवर कार खरेदी करा, अन्यथा दुसर्या विक्रेताशी संपर्क साधा.




























































