Harley Davidson ची पहिली ‘इलेक्ट्रिक सायकल’ लवकरच होणार लॉन्च..

हिंदुस्थानात आपली प्रीमियम मोटारसायकल विकणारी कंपनी हार्ले डेव्हिडसनने 1903 च्याही आधी आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली होती. ज्याला नवे रूप देण्यासाठी कंपनीने नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे. या प्रोजेक्टचे नाव ‘Serial 1 Cycle Company’ कंपनीच्या जुन्या मोटारसायकलच्या निक नेमवर ठेवण्यात आले आहे.

harley-davidson-electric-cycle-harley-davidson-introduced-electric-bicycle-know-what

कोरोना संकटात जगभरात इलेक्ट्रिक सायकलची मागणी वाढली आहे. हेच लक्षात घेऊन कंपनीने आपल्या या नवीन प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. नुकतेच कंपनीने या सायकलचे काही फोटो सार्वजनिक केले आहेत. मात्र कंपनीने या सायकलबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.

nationalherald_2020-10_cb5d1fee-9c85-4a17-a844-7672c6f994a7_bicycle

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर या सायकलमध्ये पांढरे टायर्स, हॅण्डल ग्रिप्स आणि सिल्क ब्लॅक फ्रेम दिली आहे. कंपनी 2021 मध्ये ही सायकल लॉन्च करण्याचा विचार करत आहे. यासह बीएमडब्ल्यू इलेक्ट्रिक बाईक व मोटारसायकल बनवण्याची तयार करीत आहे. तर ऑडी इलेक्ट्रिक माउंटन बाईकवर काम करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या